पहिल्या अखंड मराठी रेडीओचा लाभ घ्या.

कार्यक्रमाची रूपरेषा

मराठी रेडिओ च्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे का? जर कार्यक्रम माहिति असेल तर अधिक चांगले होईल.

संस्क्रुती.....!

शेवटी संस्क्रूती ..म्हणजे काय..? संस्क्रुती म्हणजे बाजरीची भाकरी.. वांग्याचं भरीत..गणपती बाप्पा मोरया ची मुक्तं आरोळी. केळीच्या पानातील भाताची मूद व त्यावरील वरण ..उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा घाट. मारुतीच्या देवळात एका दमात फोड्लेल्या नारळाचे उडालेलं पाणी..दुसर्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार. दिव्या दिव्या दीपत्कार..आजीनं सांगीतलेल्या भूताच्या गोश्टी..मारुतीची न जळणारी व वाटेल तेंव्हा लहान मोठी होणारी शेपटी..दसर्याला वाटायची आपट्याची पाने..पंढरपूर चे धूळ व अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे..आणी साखर फुटाणे..सिंहगडावर भरून आलेली छाती आणी दिवंगत आप्तांच्या मुठ्भर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला पुसट स्पर्श.. कुंभाराच्या चाकावर फिरणार्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाट्दार मडके घडावे..तसा ह्या अद्रुश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो .. कुणाला विदेशी कपबशी चा..

--- उरलं सुरलं मधून

पुणेकर...!

..आता तुम्हाला पुणेकर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो.

आठवणींच्या पाऊलवाटा..!

ऐरणीच्या देवा तुला ..! हे आवड्तं गाणं रेडिओवर लागलं आणि फार वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला. नाताळ च्या सुट्टीत आम्ही नाशिकला कमल आत्याकडे जायचो. [नाशिक चे लोक नाशिकला नासिक आणि गोदावरीला गंगा म्हणतात, हे तेव्हा कळलं.]आत्या पंचवटीत राहायची. भल्या पहाटे, मी आणि आतेभाऊ, गंगेवर बाजार भरायचा, तेथे शेण गोळा करायला जायचो. सहा साडे सहा पर्यंत शेणाच्या टोपल्या घेवून हळू हळू परत यायचो. पहाटेची वर्दळ सुरु व्हायची. हलवाई मारवाडया कडे स्वस्त सेपरेटा [Low Fat]दूधासाठी रांग लागायची. बाजुच्या पापडी वाल्याची तेलाच्या भल्या मोठ्या कढाया लावायची तय्यारी सुरू व्हायची.शंकराचार्यांच्या मठात पहाटेची आरती सुरु व्हायची. एकदाच्या, शेणाच्या टोपल्या, आणून टाकल्या की हातात गरमा गरम चहा मिळायचा. आता जमिनी सारवायचं काम, आते बहिणींचं असायचं. आत्याची आर्थीक परिस्थीती फारच बेताची होती. चुलीजवळच्या खुंटीवर, एक लेदर कव्हर असलेला बुश चा ट्रांझिस्टर रेडिओ टांगलेला असायचा. सकाळी सातच्या गाण्याच्या कार्यक्रमात लताबाईं चं "खेळ मांडियेला", किंवा "ऐरणीच्या देवा तुला" गाणं लागायचं आणि रोजच्या विवंचनांत ग्रासलेला आत्याचा चेहरा विशेष आनंदात गुणगुणायला लागायचा.अभिजात संगीतात किती ताकद असु शकते हे समजायचं वय नव्हतं पण गाणी सुरु झाली कि, आत्याला तिच्या विश्वात disturb करायचं नाही हे मात्र नक्कीच समजायला सुरुवात झाली होती.

सोहळे

थोडेफार सणवार थोडक्यात सविस्तर मांडण्याचा
छोटासा प्रयत्न ...

आली आली मकरसंक्रांत, पतंगांनी फुलला आसमंत!
गुळाची पोळी अन तिळाची वडी, रंगीबेरंगी हलवा अन पांढरी शुभ्र रेवडी !
थोरा-मोठ्यांना तिळगुळ वाटू, सौभाग्याच लेण सवाश्णीना लुटू !

आली आली होळी, घरोघरी पुरणपोळी !
जीवनातील वाईट गोष्ट, होळीच्या ज्वाळा करतील नष्ट !
पुरणाचा नैवेद्य होळीला देऊ, चांगल्या गोष्टींचा वसा घेऊ !

आला आला गुढी पाडवा, गोड साखरमाळ अन कडूनिंब कडवा !
गुड्या उभ्या घरोघरी, नव्या वर्षाला सुरवात खरी !
नवा संकल्प, नवे पंचांग, नवीन वर्ष जाऊदे यथासांग !

आहेर भावाला भावनांचा

सुवार्ता मायदेशी,
लगीन घाई उडाली अशी

भाऊ माझा धाकला,
अन त्यातून एकला

साखर-पुडा जोरात,
नवऱ्यामुलीच्या दारात

बहिण मी परदेशी,
तत्क्षणी जावू कशी

माझे आनंदी मन,
स्वप्न रेखाटे छान

मनाची भरारी थोर,
क्षणी गाठले माहेर

सुखी रहा जोडीन,
जशी सहाण-चंदन

करते आज दुरून,
तुम्हा सर्वांचे अभिनंदन !

-अर्चना जोशी

आशिर्वादांचे तोरण..!

आज एका विशेष वाढ्दिवस..! आठवणींच्या पाऊलवाटा शोधत असताना पुन्हा एकदा लहानपणीची आज्जीची आठवण मनात दाटुन आली. संध्याकाळच्या वेळी, आज्जी हात पाय धुवून यायला सांगायची आणि तांब्याचं तबक घेऊन ओवाळायला यायची. तबकातील निरांजनाची थरथरती ज्योत, चार अक्षता, तिची एकुलती अंगठी, २ फुलं,एखादा पेढा, चिमुटभर पांढरा कापुस, आणि हिरवागार दुर्वांकूर, सारं सारं नजरेसमोर आलं. ओवाळताना, काहितरी पुटपुटायची आणि कापूस आणि दुर्वांकूर डोक्यावर टाकताना " कापसा सारखा म्हातारा हो ..दुर्वांकुरा सारखा वंशवेल वाढू दे.." म्हणून शब्द उमटायचे आणि तिच्या सुरकुतलेल्या चेहर्यावरील थकलेल्या डोळ्यांत आशिर्वादांच्या लाटांना उधाण यायचं.

या विकांताला काय ऐकायला आवडेल?

नाट्यसंगीत
25% (स्थानिकीकरण)
शास्त्रीय
17% (स्थानिकीकरण)
भावगीते
58% (स्थानिकीकरण)
अंतिम लेखन

रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम

या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर खास मराठी गाण्यांची मैफील ऐका.

नवीन कप्पा: 
, 2010-08-24 12:45

टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!

परवा एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज! ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली

सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतात. शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे.

संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात
आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते.

स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक
स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो
मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोड" पाशी येऊन थांबलाय