पहिल्या अखंड मराठी रेडीओचा लाभ घ्या.

marathi radio

All The Best to marathi radio.

Dhamadhikari Vyakhan

Last Sunday June 26th while checking Marathi radio for Marathi songs, came across Darmadhikari Vyakhan. This was enlighting and wonderful information about current crises in Maharashtra. I was amazed to find out how ignorant we as Maharastrians are when comes what our Sachivalaya does for Maharastrian.

Wish there was a audio format of Kas Kay Patil bar hay Ka by Avinath Dharmadhikari

तळ्याकाठी (संदीप खरे)

अनेकदा तुकोबा "भंडाऱ्या'वर जाऊन बसायचे. ते केवळ घरात बायका-पोरांची कटकट होते एवढ्यासाठीच? "वृक्षवल्ली आम्हा सोयरे' म्हणताना ते लिहितात ः "तुका म्हणे होय । मनाशी संवाद। आपुलाचि वाद । आपणासि।।' अवघ्या काही शब्दांत साऱ्या विजनवासाचं नेमकं इंगित ! विचार केल्यावर जाणवतं- खरंच कुठं आहे हा मनाशी संवाद? स्वतःमधलं खरं-खोटं तपासणारा हा अगदी मोकळ्या मनानं केलेला "आपुलाचि वाद आपणासि' आहे तरी कुठं?

काय अवस्था करून घेतल्येय ना आपण स्वतःची! प्रगती, संपत्ती, स्पर्धा यांतून ही सिमेंट-कॉंक्रिटची जंगलं उभी राहिली केवळ आणि आपण त्यात भरकटलेले सारेजण! कानावर कुठला आवाज नाही, असा एक क्षण जात नाही; मग ती पहाट असो, सकाळ-दुपार असो वा मध्यरात्र! रहदारीचे आवाज, विनाकारण आणि अखंड वाजविल्या जाणाऱ्या हॉर्न्सचे आवाज, घरातल्या रेडिओ-टीव्हीचे आवाज, उत्सवांमध्ये, प्रत्येक जयंती-मयंतीला उभ्या राहणाऱ्या लाउडस्पीकरच्या भिंतींचे आवाज, प्रचारांचे आवाज, स्वतःचं प्रदर्शन मांडणाऱ्या भक्तीचे, उपासनांचे आवाज...आणि हे सारं काही कमी म्हणून अगदी झोपेतही मनात, मेंदूत चालू असलेल्या कल्लोळांचे अखंड आवाज.

असं वाटतं की, जगण्याचाही एखादा रिमोट कंट्रोल असायला हवा होता. कोलाहलामध्ये भिरभिरून जायला झालं की, थोडा वेळ का होईना, पण त्यातलं "पॉज'चं बटण दाबावं!

माझ्या मते हे "पॉज'चं बटण म्हणजेच कवी अनिलांची ही आजची कविता! दहा ओळींमध्ये एका तळ्याच्या काठावरचं हे स्केच! हे स्केच खरं तर त्या गोष्टीचं नाही. तिथल्या शांततेचं, वातावरणाचं आहे. इथं शांतता स्वतःच थकून निवाऱ्याला येते, गळणारं पान सळसळ आवाज करत नाही, मासळीसुद्धा उसळीचा नाद होऊ देत नाही आणि बगळा एका पायावर एखाद्या हटयोग्यासारखा निःसंग उभा आहे! हा पॉज आहे! दृश्‍यं दिसतायत, आवाज गायब आहे. सारं काही निवळशंख दिसतंय. हे असंच्या असं टिपायचं, यात मिसळायचं तर इथं श्‍वासांचा आवाज होऊ द्यायचा नाही. इतकंच काय, हालचालींचा, अगदी उघड-मीट करणाऱ्या पापण्यांचाही आवाज होऊ द्यायचा नाही! इथं नुसतं असायचं आहे!

सुरवातीला तर अगदी विचित्र वाटेल...सवयच नाही ना अशा शून्य शांततेची...आणि मग थोडासा कंटाळा...मग कदाचित मूर्खपणाच वाटू लागेल..."काय हे...नुसतं वेड्यासारखं बसलोय आपण! वेळ चाललाय फुकट...सेकंदांचे पैशात, यशात रूपातर होत नाहीए!' भीतीसुद्धा वाटेल...पण अगदी काहीच वेळ...! जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिसळून जावा, तशी ही शांतता लपेटून घेईल! सगळे विचार ः कालचे, आजचे, उद्याचे, घराचे, ऑफिसचे, राजकारणाचे, समाजाचे, अगदी सगळे सगळे विचार धुळीसारखे हळूहळू खाली बसू लागतील! असं वाटू लागेल की, अगदी जन्मापासून डोक्‍यावर असलेलं विचारांचं, आवाजांचं, काळाचं ओझं कुणी खाली उतरवून ठेवलं आहे!
हे असं काही होण्यासाठीच आपण पिकनिकला, आउटिंगला जात असू का? पण तिथं गेल्यावरही जंगलात, गड-किल्ल्यांवर मोठमोठ्यानं रेडिओ लावण्याची, गोंगाटाची कशी ही तऱ्हा आपली! त्यापेक्षा अशा एखाद्या तळ्याकाठी बसलं तर?! जिथं आनंद बाहेरून पकडायचा, कमवायचा नाही; तर आपल्याच आतलं दार उघडून त्याला आपल्या आतूनच मोकळं होऊ द्यायचं आहे! हलकं हलकं व्हायचं आहे...

मग कुणास ठाऊक काय काय होईल...शांततेच्या या तळ्यात बसून राहताना आतूनच काही अभावितपणे उमलू लागेल! नाद, स्पर्श, रूप, गंध, चव यांचे खरे खरे अर्थ कदाचित आकळू लागतील. चकवा लागलेले पाय "ज्या जागी तू उभा आहेस, तिथंच "तू आहेस', असं सांगू लागतील आणि जन्मभर काहीतरी शोधत राहण्याची, वणवण करण्याची आसक्ती, सारा प्रवास त्या क्षणीच थांबून जाईल! आणि मग कदाचित पाखरं गातात; तितक्‍या सहजपणे गळ्यात गाणं येईल, वाऱ्याइतके नैसर्गिकपणे श्‍वास येऊ-जाऊ लागतील, मजेत डुलणाऱ्या लता-वेलींसारखी आयुष्याची लय सापडेल; अंगात भिनेल. शब्दावाचून स्वतःशी इतकं प्रामाणिक, नितळ बोलताना "शब्दांच्या पलीकडले' काही प्रकाशेल आणि "अरे अरे ज्ञाना झालासि पावन'चा घोष आनंदविभोर होऊन मनात उसळू लागेल!

शांततेच्या गर्भातून अवतरलेल्या शब्दांच्या मग "गाथा' होतील आणि पाहता पाहता "तुकोबा'चा "विठोबा' होऊन जाईल...! अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसलेला "मी' मला पाहायचा आहे फार फार दिवसांपासून...नव्हे; कदाचित फार फार जन्मांपासून!

लाकूडतोडयाचा मुलगा !

लाकूडतोड्याचा मुंबईतला मुलगा प्रथमच बायकोला घेउन गावी आला होता.
ज्या विहीरीत कु-हाड पडल्यामुळे सासर्याचा भाग्योदय झाला ती विहीर बघायची तिला फार ईच्छा होती.
'अय्या किती खोल आहे 'असे म्हणत असतानाच तोल जाउन ती विहीरीत पडते.
आता देवाचा धावा करण्याची पाळी लाकूडतोड्याच्या मुलाची असते !
देव तत्परतेने बिपाशा बसूला बाहेर काढतो आणि ही का तुझी बायको ? असे विचारतो.
लाकूडतोड्याचा मुलगी आधी हो मग नाही मग परत हो अशा अर्थाने माना हलवत राहतो व शेवटी निर्धाराने "हो" म्हणून सांगतो !
देव संतापून म्हणतो, कलीयुग म्हणतात ते हेच !
कोठे तुझा बाप आणि कोठे तू, या Item girl ला आपली बायको म्हणून सांगतोस !

या भिंतीच म्हणून राहिल्यात... ! [ Sandeep Khare ]

ग डकऱ्यांच्या नाटकात एका स्त्रीपात्राच्या तोंडी एक वाक्‍य होतं, ""आम्हा स्त्रियांनी पायाने बांधलेल्या गाठी तुम्हा पुरुषांना हातानेसुद्धा सोडवता येणार नाहीत!'' डायरेक्‍ट सिक्‍सर असं वाक्‍य! उपजत शहाणपणानं, सामर्थ्याने संसार तोलणाऱ्या स्त्रिया! संयम, सोशिकता, चिकाटीच्या बळावर जगाला तोंड देणाऱ्या स्त्रिया! नव्या काळात तर अत्याधुनिक ज्ञानाने संपन्न होऊन घरासोबत बाहेरही चौफेर संचार करणाऱ्या स्त्रिया! पण.. पण... पण... "नवरा' नावाचं प्रकरण आयुष्यात आलं की प्रसंगी आत्मसन्मान, अभिमान सगळं बाजूला ठेवून स्त्रिया जरा जास्तच हळव्या होऊन जातात.

माझे आजोबा एक गमतीशीर गोष्ट सांगायचे. त्यांच्या ऑफिसमधला एक माणूस त्याच्या बायकोला रोज मारायचा. ("मर्द'पणाच्या तथाकथित व्याख्येत पूर्वी याचाही समावेश होता म् हणे आणि दुर्दैवाने काही प्रमाणात "सुशिक्षित' घरांमध्ये आजही!) तर सांगायचा मुद्दा म्हणजे रोज मार खाऊन खाऊन तिला बिचारीला मार खायची सवयच लागून गेली. एकदा ऑफि सच्या कामानिमित्त हा नवरा पंधरा-वीस दिवस बाहेरगावी गेला. इकडे हिच्या गळ्याखाली काही घास उतरेना. जेवणखाण पार निम्म्यावर आलं. नवरा येऊन पाहतो तर बायको एकदम अशक्त, सुकलेली, खंगलेली! नवरोजी त्यावरही खवळले आणि "स्वतःची काळजी घेता येत नाही का?' म्हणून त्याच दिवशी बायकोला बडवलं. झालं! बायकोचं जेवण त्याच दिवशी पुन्हा एकदम फटकन नॉर्मलला येऊन गेलं!

हा किस्सा कदाचित थोडा क्रूर अतिशयोक्तीचा असेलही; पण या निमित्तानं नवऱ्याच्या तऱ्हेवाईकपणाचे ऐकलेले असे कितीतरी किस्से आठवतात. पदरानं डोळे टिपत आईला किंवा जवळच्या मैत्रिणीला दबक्‍या आवाजात सांगितलेलं किंवा कुणालाच सांगता येत नाही असं काही असेल तर मनातल्या मनातच दाबून टाकलेलं! तथाकथित नवरेशाहीच्या किती तऱ्हा.. घोरणारे नवरे... चारचौघात मोठमोठ्याने आरडाओरडा करणारे नवरे... ज्या खोलीत जातील तिथं पसारा मांडून बसणारे नवरे... जेवणात काही डावं-उजवं झालं तर घर डोक्‍यावर घेणारे... दहा मिनिटं उशीर झाला बायकोला आवरायला, तर पुढचे दहा तास फुगून बसणारे... कानात दाढीचा फेस राहिलेला दिसतोय तरी बायकोला नीटनेटकेपणा शिकवणारे... न सा ंगता हॉटेलात मित्रांबरोबर परस्पर जेवून येणारे... सिगारेटच्या धुरानं घर कोंडणारे... पार्टीच्या धुंदीत तोंडाला येणाऱ्या उग्र वासाची पर्वा न करता नवरेपणाचा हक्क बजावणारे नवरे! सा ंगायला बसलं तर एखादं छोटं पुस्तक होईल (आणि त्यात बायकांचा "फीडबॅक' घ्यायचा म्हटलं तर एखादा महाग्रंथ!)

पण तरीही - अगदी तरीही - "नवरा' म्हटलं की बायकोला कोण कौतुक! चारचौघांत त्याला कुणी उणं बोलू नये, दुखवू नये, त्याचा स्वाभिमान जपावा म्हणून तिची किती धडपड! मग ती धुणंभांडी करणारी कोणी कामवाली असू दे, वा कॉर्पोरेट क्षेत्रातली कोणी वरिष्ठ अधिकारी! कितीही स्वावलंबी झाली, नवऱ्यानं कितीही "नवरेगिरी' केली तरी तिच्या आतली बाई पणाची ही ओढ किती नैसर्गिक आणि सहजसुंदर!

अनुराधा पोतदारांची ही कविता वाचताना हे सगळं सहज मनात येऊन गेलं. त्यांच्या कवितेतली ही स्त्री कोण असावी? पतीचं निधन झालेली कोणी? एखादी परित्यक्ता? एखाद्या क्षेत्रात कर्तृत्वाची बुलंद उंची गाठताना विचारपूर्वक एकटी राहिलेली कोणी कलाकार- विदुषी- उद्योजक?
बहुतेकदा "असून अडचण' असलेला नवरा "नसला' तर फक्त खोळंबाच होतो का अजून काही त्याही पलीकडचं? कितीही सामर्थ्यशाली, स्वावलंबी झाली तरी आतून कुठेतरी "पुरु षावाचून' ही भावना एकटेपणाच्या छटा घेऊन येत असेल का? तो रागावतो, दमदाटी करतो, रुसतो, बंधनं घालतो, पण बाळ होऊन कुशीतही घुसतो, चवदार स्वयंपाकाला पोटभर दाद देतो आणि हक्कानं लाड करून घेतो, तेव्हा "क्षणभराच्या पत्नी'त दडलेली "अनंतकाळची माता' तर सुखावत नसेल? कातरवेळी तिन्ही सांजा दाटून आलेल्या असताना तो एकदम दणदणाट करत घरात घुसतो, मोठ्यामोठ्यानं बोलू लागतो, गडगडाट करून हसू लागतो (अगदी स्वभावानुसार बारीकसारीक कारणावरून खेकसू लागतो) आणि का कुणास ठाऊक, तिला वाटतं की घरातले दिवे एकदम जास्त उजळून गेले आहेत. "काय काळजी करत बसतेस गं छोट्या- मोठ्या गोष्टीवरून' असं जरा दटावतच तो तिला कुशीत ओढून घेतो, तेव्हा तिचं सगळं शहाणपण, रागरुसवे, "डिग्य्रा' विसरून ती फक्त एक "वेडूबाई' बायको होऊन बसते! मग खिडक्‍या लावल्या असल्या तरी पण जाऊन ती पडदे पण ओढून घेते! सगळ्या दारं-खिडक्‍यांना घरातल्या छोट्या-मोठ्या वस्तूंना, हौसेनं केलेल्या फुलांच्या सजावटीला, क्वचित बिघडलेल्या नव्या रेसिपीला, नव्या दागिन्याला, ऑफिसमधल्या प्रमोशनला, सासूबरोबरच्या छोट्यामोठ्या भांडणाला, मुलं अभ्यास करत नाहीत या तक्रारीला आणि सगळ्या असण्यालाच एक अर्थ आल्यासारखं वाटू लागतं!

जरा विवादास्पद वाटेल; पण नवरा असला की बहुतांश बायकांना जरा धांदरट, विसराळू, "येडचाप'सारखं वागावंसं वाटतंच... नाही, हे मी म्हणत नाही- युगानुयुगांपासून असंख्य घरा ंच्या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून!

या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून
एक पुरुष हवा आहे!
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे
बटणं सापडत नाहीत म्हणून,
आरडाओरडा करून,
घर डोक्‍यावर घेणारा,
आमटीला फोडणी खमंग पडली
म्हणून खुषालून जाणारा
केसांतून बोटे फिरली की,
बाळ होऊन कुशीत घुसणारा
दमदार पावलांनी - तिन्ही सांजेचा,
केविलवाणा अंधार उधळून लावणारा
पुरुष हवा आहे
या घराला - एक आडदांड पुरुष हवा आहे
नाही हे मी म्हणत नाही
या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून

अनुराधा पोतदार
(कॅक्‍टस फ्लॉवर या काव्यसंग्रहातून)

त्झेन सूशी

त्झेन सूशी..
जाता जाता थोडसं ..

इयत्ता ८वीत असताना आमचे गुर्जर मास्तर सांगायचे ..माझा भाऊ जपानला गेला ..तिथे भुकंप झाला .. सगळे मेले ..माझा भाऊ तेवढा वाचला. तेंव्हा त्यांच्या बोलण्याचे हसू यायचं.

परवाच टोकिओ मधील काही मराठी मित्र मंडळींशी बोलण्याची संधी मिळाली . नुकत्याच झालेल्या भयाण
सुनामी व भुकंपाचे पडसाद खूप काळ
टिकणार आहेत. अशाही भीषण परिस्थितीत जपानी लोकांनी जो संयम जगाला दाखवून दिला आहे त्याला तोड नाही .

1. THE CALM :

Not a single visual of chest-beating or wild grief. Sorrow
itself has been elevated.

2. THE DIGNITY

पुरण पोळी

मैत्री चे नाते

खालील ओळी मला शनिवारी दिनांक १४ ऑगस्ट २०१० ला सकाळी उठल्या उठल्या सुचल्या कारण मी झोपताना विचार करत होतो आपण जमवलेल्या मित्रांबद्दल व त्याच्या कडून मिळत असलेल्या अपेक्षा विरहित साप्पोर्त बद्दल. हा विचार सहज झोपताना मनात होता.कदाचित प्रत्यक्षात मला या भावना व्यक्त करता येत नसतील म्हणून या चार ओळी.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
नाती रक्ताची ,नाती नात्याची
कुठली बर महत्वाची?
ज्या मध्ये असते किंमत आत्मीयतेची
अशीच वाटतात नाती सर्वस्वाची

!! ऋणानुबंध !!

जीवानिशी बर काही वाटत नाही,
आई काही या क्षणी गवसत नाही
तुलाच दिली मी हाक सखे अन...
हातच सार सोडून मजसाठी धावलीस तू

शब्दाचा तर धीर तू देतच आलीस
अनुभवांनी जडी- बुटी हि सांगत राहिलीस
उभ्या कुटुंबाची शिदोरी तू हक्काने बांधलीस
कोण्या जन्माची पुण्याई सखे मला लाभलीस तू

ऋण नाही म्हणणार मला मैत्रीची आहे जाण
हाकेला तुझ्या धावेन माझ्या पिल्लांची मला आण
अशी किती मोठी गं पिल्लं तुझी, अशी कितीशी तुला उसंत
पण...माझ्या पिल्लांसाठी सुद्धा झेपावलीस तू

श्रद्धांजली..!

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी म्हणजे प्रयत्न, प्रतिभा, परमेश्‍वरी वरदान व प्रचंड जिद्द यांचा सुरेल संगम. भारतीय संगीताची ध्वजा उंचावणारे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक, "संतवाणी'तून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे कीर्तिवंत कलावंत असलेल्या पंडितजींच्या जीवनाची व त्यांच्या संगीताची कहाणी अद्‌भुतरम्य आहे. बहुआयामी जीवन जगलेल्या व आपल्या गायनाने भारतवर्षाला मोहिनी घातलेल्या या महान कलावंताचे जीवन खऱ्या अर्थाने "कृतार्थ'...

मराठी रेडिओ तर्फे मनःपूर्वक श्रद्धांजली .